अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला सुरुंग ! शहराध्यक्ष संभाजी कदमसह बारा माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे

Ahilyanagar 11 former corporators in Eknath Shinde Sena: संभाजी कदम,बाळासाहेब बोराडे, गणेश कवडे यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र,

  • Written By: Published:
Ahilyanagar News

Big blow to Uddav Thackeray group in Ahilyanagar 11 former corporators in Eknath Shinde Sena: विधानसभा निवडणुकीत जोरदार झटका बसलेल्या उद्धव ठाकरे (UddavThackeray) यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) इनकमिंग वाढले आहे. अहिल्यानगर शहरातून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खंदे समर्थक असलेले शहराध्यक्ष संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराडे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांच्यासह बारा माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. या सर्वांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना फुटल्यानंतर आता 80 टक्के माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत गेले आहेत.

Maha Kumbh 2025 : मोठी बातमी! पंतप्रधान मोदी महाकुंभाला जाणार नाहीत, दौरा रद्द

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अहिल्यानगर शहरात जबरदस्त ताकद यामुळे वाढली असल्याचे बोलले जात आहे. आता उद्धव ठाकरे सेनेमध्ये शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड यांच्यासह मोजकेच माजी नगरसेवक पदाधिकारी राहिले आहेत. संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, सुरेश तिवारी, संतोष गेनप्पा, दत्तात्रय कावरे, संदिप दातरंगे, सुरेश तिवारी, परेश लोखंडे, कैलास शिंदे, संग्राम कोतकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. यापूर्वीच माजी नगरसेवक व माजी नगरसेवक दिलीप सातपुते, सचिन जाधव हे शिंदे सेनेत गेलेले आहेत. त्यानंतर हा दुसरा मोठा धक्का आहे.