‘सर्व ब्राह्मण रशियातून आले आहेत, आपण त्यांना हाकलले पाहिजे’ आरजेडी नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव यांचे ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. यदुवंश कुमार म्हणाले की, “डीएनए चाचणीत असे दिसून येते की ब्राह्मणांपैकी कोणीही या देशामधील नसून ते रशियाचे आहेत. ते आता स्थायिक झाले आहेत. पण ब्राह्मण आपल्यात फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण […]

Sharad Pawar (4)

Sharad Pawar (4)

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव यांचे ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. यदुवंश कुमार म्हणाले की, “डीएनए चाचणीत असे दिसून येते की ब्राह्मणांपैकी कोणीही या देशामधील नसून ते रशियाचे आहेत. ते आता स्थायिक झाले आहेत. पण ब्राह्मण आपल्यात फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांना येथून हाकलले पाहिजे.”

मागील आठवड्यात 29 एप्रिलला आरजेडी नेते यदुवंश कुमार यादव बिहारच्या सुपौलमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात वादग्रस्त विधाने केली. यदुवंश म्हणाले की, या देशात फक्त यादव समाजच या देशाचा मूळ आहे. ब्राह्मण या देशातील नसून रशियाचे आहेत हे डीएनएमधून स्पष्ट आहेत. आपण त्यांना हाकलले पाहिजे.

‘आप’च्या अडचणीत मोठी वाढ; दारु घोटाळ्यामध्ये राघव चढ्ढा यांचे नाव आले समोर

यदुवंश कुमाराच्या वक्तव्यावर जेडीयूमधूनच विरोध

दुसरीकडे जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा यांनी यदुवंशच्या ब्राह्मणांवर केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली. असा सवाल करत ते म्हणाले की, परशुराम रशियातून आले होते ? की दुसऱ्या देशातून? ते पुढे म्हणाले की, राजकारणी केवळ मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी अशी वादग्रस्त विधाने करतात.

Exit mobile version