Download App

Devendra Fadanvis : … फक्त उपमुख्यमंत्री होणार हे मला शेवटच्या दिवशी कळालं

  • Written By: Last Updated:

मुंबई ः शिवसेनेतून वेगळा गट बाहेर पडून एकनाथ शिंदे हे जेव्हा आमच्याबराेबर आले. मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, फक्त उपमुख्यमंत्री होणार हे मला शेवटच्या दिवशी कळालं. मुख्यमंत्रीपद त्यांना द्यायचं ही माझीच कल्पना होती. हा प्लॅन आमच्या पक्षातील वरिष्ठांना सांगितल्यानंतर ही गोष्ट पचायला त्यांना काही काळ लागला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार येणार्या अर्थसंकल्पच्या आधी होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र म्हणाले की,  मातोश्रीचे दरवाजे हे उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी बंद केले. मी केले नाही. ठाकरेंना बऱ्याचदा फोन केला. परंतु, त्यांनी तो उचलला नाही. माझं कोणाशी वैर नाही. मी कोणाशीच राजकीय वैर धरत नाही. आजही त्यांच्याशी वैर नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो. सरकार चालवतो. त्यांनी दार बंद केली. हे त्यांनी केलं की इतर कोणी केलं माहीत नाही.

Tags

follow us