Download App

Kasba By Election: पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, हा रडीचा डाव

नागपूर : जेव्हा पायाखालची वाळू सरकते. तेव्हा असे आरोप होऊ लागतात. मात्र हे आरोप भाजपवर (BJP) नाहीत. तर हे आरोप मतदारांवर आहे की, मतदार पैसे घेऊन मतदान करतात. मतदारांचा असं अपमान करण्याचा कुठला ही अधिकार काँग्रेस एनसीपी पक्षाला नाही. पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

कसबा आणि चिंचवडमध्ये (Chinchwad Kasba By Election) पराभव स्पष्ट दिसू लागल्याने महाविकास आघाडीचे धाबे दणाणले असून, त्यांच्याकडून आता रडीचा डाव सुरू आहे. मतदारांचा अपमान करीत आहेत. भाजपा कधीच पैसे वाटत नाही. त्यामुळेच लोक आम्हाला निवडून देतात. आमची संस्कृती पैसे वाटण्याची नाही, ती काँग्रेस-राष्ट्रवादीची संस्कृती आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने असले उद्योग केले जात आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.

एकनाथ शिंदे सुरतला निघून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन करत मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”जे सांगायचंय ते मीच सांगितलं आहे. मात्र अशा गोष्टींवर रोज चर्चा करायची नसते. त्याची योग्य वेळ असते. योग्य वेळी सगळ्याच गोष्टी सांगू, असेही त्यांनी म्हटले.

Ahmednagar गंगामाई साखर कारखान्याला मोठी आग

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर महाविकास आघाडीने केले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, काही लोकांना वाटते की सारे काही आपल्याच काळातील आहे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांपैकी सव्वा दोन वर्ष ते बंद दाराआड होते. उर्वरित दोन-तीन महिन्यात त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असेल तर मला त्याबाबत माहिती नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुढं देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला आणि तो केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. केंद्राने काल त्याला मंजुरी दिली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा यासाठी अत्यंत आभारी आहे. पण, काही लोकांना वाटते सारे आपल्याच काळातील आहे. कदाचित ते हेही सांगू शकतात की, त्यांनी मोदीजींना फोन केला आणि त्यामुळे हे नामकरण झाले.

Tags

follow us