MP Sharad Pawar gifted meditation books : जगभरातील तब्बल १४३ देशांत ध्यानधारणेचे धडे शिकवणाऱ्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना ध्यानधारणेची पुस्तकं भेट देण्यात आली. अहिल्यानगरमधील हॉटेल यश ग्रँड येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पदमविभूषण पुरस्कार मिळालेल्या शरद पवार यांची विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक बी. के. डॉ. दीपक हरके यांनी भेट घेतली. तसेच यावेळी डॉ. दीपक हरके यांनी शरद पवार यांना ध्यानधारणेविषयी (Meditation) मार्गदर्शन करत, ध्यानधारणेची पुस्तकं भेट देखील दिली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे आणि बी. के. पांडुरंग हे देखील उपस्थित होते.
ध्यानधारणेबाबत मार्गदर्शन करत असताना ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. हरके यांनी सांगितले की, ध्यानामद्धे राजयोग ध्यान हा नावाचा एक प्रकार पाहायला मिळतो. जो प्रकार सर्व पार्श्वभूमीच्या लोकांना करता येऊ शकतो. या प्रकारात कोणत्याही विधी किंवा मंत्राशिवाय ध्यान केलं जातं. विशेष म्हणजे राजयोग ध्यान या प्रकाराचा सराव तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. राजयोग ध्यान या प्रकाराचा सराव हा उघड्या डोळ्यांनी केला जातो. ज्यामुळे ध्यान करण्याची पद्धत ही बहुमुखी, सोप्या स्वरूपाची आणि सरावासाठी सहज अशी बनून जाते. ध्यानाबद्दल बोलायचं झालं तर ती एक अशी अवस्था आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनातील चेतनेच्या पलीकडची असते. जिथून आपलं अध्यात्मिक सशक्तीकरण सुरू होतं. ध्यानधारणा आणि योगाच (Yoga) आपल्या जीवनातील महत्व यावेळी त्यांनी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं.
खराडी ते खडकवासला अन् नळस्टॉप ते माणिकबाग मेट्रो धावणार, केंद्राची मंजूरी
अध्यात्मिक जागरूकता ही आपल्याला नकारात्मक आणि व्यर्थ असलेल्या विचारांपासून दूर राहून चांगले आणि सकारात्मक विचार निवडण्याची शक्ती देत असते. परिणामी त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी चांगल्या विचारांना प्रतिसाद देऊ लागतो. आपण सुसंवादाने जगू लागतो. अधिक चांगले, आनंदी आणि निरोगी असे संबंध निर्माण करतो. या सगळ्यातून आपल्याला आपलं जीवन हे सकारात्मक मार्गाने घेणून जाण्यास मदत होते. ध्यानधारणा आपल्या दैनंदिन जीवनात किती गरजेची आहे. हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. निरोगी आणि ताण-तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यानधारणा हा एक उत्तम पर्याय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
