बंडानंतर तांबे यांचे पहिले ट्विट…. काॅंग्रेसमधील बड्या मित्राला शुभेच्छा

अहमदनगर : काॅंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर ते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता असतानाच त्यांनी काॅंग्रेस मधील मित्रांना शुभेच्छा देत आपले जुने दोर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे काॅंग्रेसमधील मित्र, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बंडानंतरचे आपले पहिले ट्विट केले आहे. अर्थात या ट्विटवर तांबेना अनेकांनी ट्रोल केले आहे. काही […]

WhatsApp Image 2023 01 13 At 2.17.39 PM (1)

WhatsApp Image 2023 01 13 At 2.17.39 PM (1)

YouTube video player

अहमदनगर : काॅंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या बंडानंतर ते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता असतानाच त्यांनी काॅंग्रेस मधील मित्रांना शुभेच्छा देत आपले जुने दोर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे काॅंग्रेसमधील मित्र, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत बंडानंतरचे आपले पहिले ट्विट केले आहे. अर्थात या ट्विटवर तांबेना अनेकांनी ट्रोल केले आहे.

कदम हे तांबे यांचे पक्षातील स्पर्धक मानले जात होते. युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोघांमध्ये चुरस होती. मात्र त्यात कदम यांनी बाजी मारत निवडणुकीच्या माध्यमातून युवक काॅंग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद पटकावले होते. त्यांच्यानंतर तांबे यांना या पदावर संधी मिळाली. आपले बंधू, असे म्हणत तांबे यांनी कदम यांना शुभेच्छा दिल्या आहे.

त्यांच्या या ट्विटवर अनेक गमतीदार मिम्स, व्हिजुअल्स टाकण्यात आले आहेत. तांबे यांच्यावर तिरकस टीका करण्यात आली आहे.

सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज भरल्यानंतर यांसदर्भात माहिती वरिष्ठ नेत्यांना दिली असून सुधीर तांबेंवर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आजच कारवाई होणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, पक्षाची फसवणूक केल्याचा आरोपही सुधीर तांबे यांच्यावर करण्यात आला आहे. तांबेंवर कारवाई होणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Exit mobile version