बिहार निकाल 2025: जितन राम मांझी आणि कुटुंबाची करामत; सून, विहीणबाई आणि जावई घरातले सगळेच झाले आमदार

जितन राम मांझी हे या निकालानंतर चर्चेत आले ते त्यांनी नातेवाईकांना दिलेले तिकिटे आणि त्यात त्यांचा झालेला मोठा विजय.

HJH

HJH

Bihar Election Result- बिहार २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयात केंद्रीय मंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या “हम” या पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली. जितन राम मांझी हे या निकालानंतर चर्चेत आले ते त्यांनी नातेवाईकांना दिलेले तिकिटे आणि त्यात त्यांचा झालेला मोठा विजय.

एके काळी नितीश कुमार यांचे जवळचे आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या मांझी यांना मुख्यमंत्रीपदावरून जेव्हा पायउतार होण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांनी बंड केलं आणि जेडीयूपासून वेगळं होत हिंदुस्थानी अवाम मोर्चाची स्थापना केली. आज हे मांझी ज्या करणामुळे चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांना NDA मध्ये भाजप आणि JD (U)  नं ६ जागा दिल्या. त्या ६ जागांवर मांझी यांनी आपल्या घरातले सदस्य उभे केले आणि निवडूनही आणले. यामध्ये त्यांचे जावई, सून, व्याही, विहीणबाई यांचा समावेश आहे. मांझी फॅमिली त्यामुळे सध्या चर्चेत आहे.

सून दीपा कुमारी

मांझी यांची सून दीपा कुमारी यांनी इमामगंज मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जवळजवळ २५,००० मतांनी विजयी झाल्या. सासू आणि सासऱ्यांनी त्यांना राजकारणाचा मार्ग दाखवला आणि आता त्या यात चॅम्पियन देखील ठरल्या आहेत. त्यांनी आरजेडीच्या रितू प्रिया चौधरी यांचा २५,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. दीपा कुमारी यांना १०४,८६१ मते मिळाली, तर आरजेडी उमेदवाराला ७९,००५ मते मिळाली.

विहीणबाई
बोधगयाला लागून असलेल्या बाराचट्टी मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या मांझीच्या विहीणबाई ज्योती देवी यांनी सातत्याने एकामागून एक सर्वच फेरीत आघाडी घेतली होती. वातावरण असं होतं की विजयाची घोषणा केवळ औपचारिकता राहिली होती.

जावई प्रफुल्ल कुमार

मांझी यांचे जावई प्रफुल्ल कुमार मांझी यांनी सिकंदरा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि २३,००० मतांनी विजयी झाले. अटारी आणि कुटुंबा मतदारसंघात मांझी यांचे नातलग विजयी झाले असून ईथं निकाल जाहीर होण्यापूर्वीच जल्लोष साजरा करण्यास सुरुवात झाली होती. एवढी ही लढत एकतर्फी झाली होती.

एकंदरीत, बिहारच्या राजकारणात यावेळी मांझी कुटुंबाने असं काही साध्य केले आहे जे लोकांना पुढील अनेक वर्षे लक्षात राहील. मोदी-नितीश लाटेत एनडीएचे उमेदवार सहज जिंकत असताना, मांझी कुटुंबाने त्यांच्या ‘कुटुंबाच्या ताकदीने’ ही कहाणी अधिक मनोरंजक बनवली.

मांझी यांचा जन्म बिहारच्या गया जिल्ह्यातील खिजरसराय येथील महकार गावात झाला. त्यांचे वडील रामजीत राम मांझी हे शेतमजूर होते. त्यांनी १९६६ मध्ये गया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. ते महादलित मुसहर समुदायाचे आहेत. मांझी यांनी काही काळ नोकरी केली, परंतु नंतर त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर, मांझी यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९८० मध्ये ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी १९९० आणि १९९६ मध्ये आमदार म्हणून काम केले. ते गया येथील बाराचट्टी येथून बिहार विधानसभेवर निवडून आले. २००८ मध्ये ते बिहारमध्ये मंत्री म्हणून निवडून आले.

बिहारचे २३ वे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी २० मे २०१४ ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि २० फेब्रुवारी २०१५ पर्यंत ते या पदावर होते. यानंतर त्यांच्या आणि नितीश यांच्या नात्यात कटुता आली होती.

Exit mobile version