Jitendra Awhad on Regulation of Coaching Centre : केंद्र सरकारने कोचिंग क्लासेससाठी (Coaching Center ) नवीन मार्गदर्शक तत्वे (Coaching Center Guidelines) जारी केलीत. यानुसार आता कुणीही केव्हाही आणि कुठेही कोचिंग सेंटर सुरू करू शकणार नाही. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला प्रवेश देता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास क्लासची मान्यता रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केलं. ही तर हुकूमशाही आहे, असं आव्हाड म्हणाले.
कोचिंग सेंटर्सचा बाजार उठणार?; सरकारचा मास्टर स्ट्रोक विद्यार्थ्यांसाठी किती फायद्याचा
असे समजते की, १६ वर्षाच्या आतील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 19, 2024
केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं की, असं समजते की, 16 वर्षांखालील कोणत्याही विद्यार्थ्याला यापुढे कोचिंग क्लासेमध्ये जाता येणार नाही. कारण की, त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, कोणी कोचिंग क्लासेस घेतल्यास त्यांना १ लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दहावीत शिकण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये पाठवून त्यांचा जादा अभ्यास करून घेण्याची पालक-शिक्षकांची मानसिकता असते. कोचिंग क्लासेस हे नोकरदार आई, वडील-पालकांनाही साह्यभूत ठरत आलेले आहेत. सारासार विचार करता, कोचिंग क्लासेमुळं विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रचंड सुधारणा होते. असं असतांना 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाहीत, ही तर हुकूमशाही आहे, असं आव्हाड म्हणाले.
Shaitaan Movie: सुपरनॅचरल थ्रिलरसाठी आर माधवन अन् अजय देवगण पहिल्यांदाच एकत्र
त्यांनी पुढं लिहिलं की, ज्यांना कोचिंग क्लासेसला जायचे असेल त्यांना जाऊ द्यावे, त्यांना थांबवता कशाला? या निर्णयाने किती शिक्षकांवर गदा येणार आहे. याचा अंदाज न केलेला बरा. मध्यंतरी घरगुती ट्यूशन्स बंद केल्या होत्या. इथपर्यंत यांची मजल जाईल की, म्हणतील. आता घरातच राहा!
नेमकी मार्गदर्शक तत्वे काय?
गेल्या काही दिवसांपासून खासगी कोचिंग शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता कोचिंग क्लासेससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नवीन नियमांनुसार, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच चांगले गुण आणि रँक मिळण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करता येणार नाहीत. कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती सेंटर्संना करता येणार नाही. मुलांच्या पालकांची दिशाभूल होऊ शकते, असे आश्वासन संस्थेचे व्यवस्थापन देऊ शकणार नाही. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरमध्ये नोंदणी करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.