‘कोचिंग क्लासेस नव्हे तर पालकांना दोषी ठरवावं’: ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

‘कोचिंग क्लासेस नव्हे तर पालकांना दोषी ठरवावं’: ‘कोटा’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

kota Suicide Case : राजस्थानातील कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केली आहे. पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमुख कारण असल्याची टिप्पणी न्यायायलाने केली आहे. त्यामुळे कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून कोचिंग क्लासेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने सुनावणी केली आहे.

Jayakwadi Dam : हक्काचे पाणी विनाविलंब सोडा; मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी अशोक चव्हाण मैदानात

कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्याच्या आत्महत्या होत नाहीत. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये कोचिंग क्लासेसची नाही तर पालकांची चूक दिसून येत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. राजस्थान कोटा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी ते ही याचिका घेऊन उच्च न्यायालयात याचिक दाखल करु शकतात, असाही न्यायालयाने सल्ला दिला आहे.

जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा निर्णय कायम

राजस्थानातील कोटा येथील विद्यार्थ्यांचं आत्महत्यांचं प्रकरण देशभरात गाजलं आहे. आत्तापर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. राजस्थानात दर महिन्याला सरासरी तीन विद्यार्थी अभ्यासाच्या दबावाखाली आत्महत्या करतात, हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.

Sanjay Raut : ‘भाजपवाल्यांची हिट विकेट, याला म्हणतात ‘आ बैल मुझे मार’; राऊतांनी पुन्हा डिवचलं

तसेच दरवर्षी सुमारे 2 लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (JEE) आणि राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी कोटा येथे येत असतात.

दरम्यान, कोटासह देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, पालकांचा विद्यार्थ्यांवरील दबाव हे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमागचं प्रमुख कारण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे कोचिंग क्लासेसला दिलासा मिळाला आहे. तसेच ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या पालकांना विचार करायला लावणारी असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube