Download App

Yoga Tips : ‘हेडॅक’ कमी करायचाय? मग, मदत घ्या ‘या’ खास योगासनांची

Yoga Tips :  शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड देण्यासाठी योग (Yoga) हा सर्वात प्रभावी उपाय आहे. योगा केल्याने तणाव, नैराश्य यासारख्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. मुलांवर अभ्यासाचे दडपण असते, अशा वेळी मानसिक अवस्था आणि स्मरणशक्ती नीट ठेवण्यासाठी मुलांना योगाभ्यासाची सवय लावायला हवी. याशिवाय प्रौढ आणि वृद्धांच्या मानसिक आरोग्यासाठीही योग फायदेशीर आहे.

मानसिक आरोग्य मजबूत करण्यासाठी योगाभ्यास करणे फायदेशीर ठरू शकते. रक्ताभिसरण सुधारणाऱ्या योगाभ्यासामुळे मेंदूशी संबंधित समस्यांवर प्रभावीपणे मात करता येते, असे योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चला तर जाणून घेऊया अशा योगासनांविषयी जे मेंदू मजबूत करतात आणि स्मरणशक्ती तंदुरुस्त ठेवतात.

आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?

बलासन

हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसा. टाचांवर शरीराचे वजन घेऊन, दीर्घ श्वास घ्या आणि पुढे वाका. मांड्यांनी छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या कपाळाने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या अवस्थेत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या.

उत्तानासन

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. नंतर दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात वरच्या दिशेने घ्या आणि नंतर श्वास सोडताना हात खाली जमिनीकडे आणा. हे करत असताना आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. मग सामान्य स्थितीत परत या.

हलासन

हे आसन करण्यासाठी जमिनीवर आडवे होऊन पाय वरच्या बाजूला करा आणि हळू हळू तसेच मागे न्या. पाय जमिनीवर मागे ठेवून काही काळ या स्थितीत स्थिर राहा.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

शवासन 

पलंगावर झोपूनही शवासन करता येते. हे आसन केल्याने मज्जासंस्था शांत होते आणि थकलेल्या स्नायूंना आणि खांद्यांना आराम मिळतो. शवासनाचा सराव करण्यासाठी पाठीवर झोपून दोन पायांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. पायांच्या बोटांच्या दिशेने शरीर सैल सोडून आरामात श्वास घ्या.

Tags

follow us