Sadabhau Khot On Devendra Fadnavis : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीने आमदार सत्यजित पाटील (Satyajit Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने शिंदे गटाचे धैर्यशील मानेंना उमेदवारी दिली आहे. या जागेवर लढण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोतही इच्छुक होते. त्यांनी वारंवार हातकणंगले लोकसभेच्या जागेची मागणी महायुतीकडे केली होती. मात्र, महायुतीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर सदाभाऊ खोतांनी (Sadabhau Khot) यावर प्रतिक्रिया दिली. फडणवीसांसाठी मी एक नाही, दोन अंगठे द्यायला तयार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
Supriya Sule : ‘बडे लोग बडी बातें’; हेलिकॉप्टरच्या फेऱ्यांवरुन हसन मुश्रीफांवर सुळेंचा हल्लाबोल
सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इस्लामपूरमध्ये देव हॉल या ठिकाणी वाळवा तालुक्यातील प्रमुख रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलतांना सदाभाऊ खोत यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, महाभारतात एकलव्याने एक अंगठा दिला होता, मात्र देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी सदभाऊ खोत दोन अंगठे द्यायला तयार आहे. एवढी निष्ठा माझी त्या माणसावर असल्याचं खोत म्हणाले.
MyLek Trailer: माय- लेकची केमिस्ट्री उलगडणार..,’मायलेक’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
ते म्हणाले, लोकसभा निवडणुक महायुती एकदिलाने लढणार आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार आहे, असा शब्दही त्यांनी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे बंधू स्तवशिल माने यांना दिला.
दरम्यान, सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र, सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेला लोकसभेची एकही जागा देण्यात आली नाही. खुद्द सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या मतदारसंघातून धैर्यशील माने यांना महायुतीने तिकीट दिले आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीही रिंगणात आहे. तर महाविकास आघाडीकडून सत्यशील पाटील रिंगणात आहेत. त्यामुळं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.