Download App

Loksabha Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे प्रशासन अलर्ट मोडवर ! टोल फ्री क्रमांकही जाहीर

  • Written By: Last Updated:

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)बिगूल वाजला असून, देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पुणे (Pune) जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी >बारामती (Baramati Loksabha) लोकसभा मतदारसंघासाठी, तर चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुणे शहर, शिरुर, मावळ या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. चार लोकसभा मतदारसंघ असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येणार आहे. या मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी टोल फ्री क्रमांक जाहीर केलाय.


Loksabha Election : भाजपने बारामती मनावर घेतले : चंद्रकांतदादांनी साऱ्या नेत्यांना बोलावलं

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन दिवसे यांनी केले आहे.

सांगलीच्या बदल्यात ठाकरेंना ‘जालना’ मिळाला : जागा देतानाच राहुल गांधींनी उमेदवारही दिला!

या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करेल, असे भरारी पथकाने जाहीर केले आहे.

अटीतटीच्या लढतीमुळे प्रशासनाला रहावे लागणार अलर्ट

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीत जोरदार रस्सीखेच असणार आहे. निवडणूकपूर्वीच नागरिकांना त्याची चुणूक दिसून आली आहे. यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या मतदारसंघामध्ये अलर्ट राहूनच काम करावे लागणार आहे. कारण राजकीय संघर्षात एकमेंकाविरोधात आचारसंहिता तक्रारी होण्याची शक्यता आहेत.

follow us