Bapusaheb Pathare Driver Complaint Against Bandu Khandve : पुण्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष उफाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांच्या ड्रायव्हरने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक नेते बंडु खांदवे विरोधात तक्रार दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? कोणते आरोप केलेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.
फिर्यादीनुसार चार ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ वाजेदरम्यान वाघोली रोड येथे बंडु खांदवे यांनी आमदार बापुसाहेब पठारे यांना (Bapusaheb Pathare) धक्काबुक्की केली. त्यामुळे फिर्यादी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेल्याचा राग मनात धरुन बंडू खांदवे (Bandu Khandve), शेखर मांझ, विलास खांदवे, कालीदास खांदवे, गणेश खांदवे, रामेश्वर पोळ, मेघराज खांदवे, प्रतिक खांदवे, सागर करजे, ओमकार खांदवे ऊर्फ ओम्या, हरीदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे आणि इतर 5 ते 6 अनोळखी (Pune Crime) लोकांनी हल्ला केला.
फिर्यादीवर हल्ला केला. कोणत्यातरी जड वस्तुने तसेच लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. तसेच फिर्यादी ( अजमोद्दीन शेख) 2 तोळे वजनाची सोन्याची चैन त्यात सोन्याचे बदाम सुमारे पन्नास हजार रूपये किमतीचे, एक हजार रूपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी करुन नेला. फिर्यादीनुसार, आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चालकावर 15 हून अधिक जणांच्या गटाने हल्ला करून सोन्याची चैन आणि रोख रक्कम लुटण्यात आली.
विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 496/2025 असा दाखल झाला असून, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(2), 118(1), 189(2), 190, 352, 191(2), 304(2) अन्वये आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात गंभीर स्वरूपाच्या कलमांचा समावेश असल्याने पुढील चौकशीदरम्यान अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय पार्श्वभूमी
बंडु खांदवे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित आहेत, तर बापूसाहेब पठारे यांचं नाव स्थानिक पातळीवर प्रभावशाली आमदार म्हणून घेतलं जातं. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग चढला असून, दोन गटांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.