मिशन स्वच्छ प्रभाग 25 निवडणुकीच्या काळात सुरू; राघवेंद्र मानकरांकडून आढावा

PMC Election 2026: प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा बाप्पू मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित आढावा घेतला.

  • Written By: Published:
Ragendra Mankar

PMC Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (PMC Election 2026) रणधुमाळीतही काही उमेदवार हे नागरिकांप्रती आपली सेवा बजावत आहेत. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेला बळ म्हणून, आमदार हेमंतभाऊ रासने (Hemant Rasane) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 25 शनिवार पेठ महात्मा फुले मंडई भागात सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’अविरतपणे सुरू असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पू मानकर (Raghavendra Mankar) यांनी दिली.

प्रभागातील स्वच्छतेविषयक गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ चा बाप्पू मानकर यांनी प्रचाराच्या धामधुमीतही नियमित आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या अस्वच्छतेविषयक तक्रारी त्यांचे निराकरण, लागणारा वेळ याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस केली. निवडणुकीची घोषणा झाल्यावरही निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहून हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे.

निवडणूकत आली की हे अभियान बंद होईल असे वाटले होते. मात्र, आमच्या शनिवार पेठ भागात आज पाचव्या वेळेस ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ टीम स्वच्छता करत आहे. यासारखे अभियान नियमितपणे राबविले जाईल अशी ग्वाही आम्हाला बाप्पू मानकर यांनी दिली असल्याचे नागरिक जयेश पंडित यांनी म्हटलंय.

मिशन स्वच्छ प्रभागच्या 25 माध्यमातून अनेक रस्ते व अरुंद गल्ल्या स्वच्छ करून घेण्यात आल्या. मिशनच्या सुरुवातीला कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी डस्ट बिनचे वाटप करण्यात आले. आजवर 80 टन कचरा उचलण्यात आला असल्याची माहिती भाजपचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिलीय.

follow us