Download App

Loksabha Election : भाजपने बारामती मनावर घेतले : चंद्रकांतदादांनी साऱ्या नेत्यांना बोलावलं

  • Written By: Last Updated:

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून बारामतीतून (Baramati) विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याचं बोलल्या जातं. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. अजित पवारांनीही या भागात सभांचा सपाटा लावला आहे. आता भाजपनेही बारामतीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली.

विजयबापू ऐकेनात… पुरंदरचा ‘ओल्ड मॅन’ पुन्हा मैदानात, अजितदादांची दादा जाधवरावांसोबत खलबत

बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक (दि.17 मार्च) रोजी रविवारी सकाळी 11 वाजता बोलावण्यात आली. मोरोपंत नाट्यगृह, नवीन कचेरी रस्ता, समर्थ नगर बारामती येथे महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टरचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

आगामी चित्रपटातील कियारा- राम चरणचा लूक होतोय व्हायरल, चाहते झाले फिदा 

या बैठकीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, आ. राहुल कुल, आ. दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादीचे नेते रमेशअप्पा थोरात उपस्थित राहणार आहे.

याशिवाय, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, गीतांजली ढोणे, भारतीताई पांढरे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, महेशजी पासलकर, आरपीआयचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, विक्रम शेलार, सूर्यकांतजी वाघमारे तसेच लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम पक्ष, रयत क्रांती संघटना, भीमसेना, पीजेपी, स्वाभिमान, जे.एस.एस, आरएसपी, ब.वि.आ, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना, लहुजी सेना या पक्षांचे आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

महायुतीचा उमेदवार निवडून आणू
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची भाजप आणि महायुतीची भूमिका आहे. बारामतीतून महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी होईल यात शंका नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांच्याशी बोलून मार्ग काढतील, असे भाजपचे नेते सांगत आहेत.

follow us