विजयबापू ऐकेनात… पुरंदरचा ‘ओल्ड मॅन’ पुन्हा मैदानात, अजितदादांची दादा जाधवरावांसोबत खलबत

विजयबापू ऐकेनात… पुरंदरचा ‘ओल्ड मॅन’ पुन्हा मैदानात, अजितदादांची दादा जाधवरावांसोबत खलबत

पुरंदर : बारामती लोकसभा मतदारसंघातील समीकरणे डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (16 मार्च) रोजी पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव (Dada Jadhavrao) यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बराचवेळ चर्चाही केली. त्यानंतर दादा जाधवराव यांनीही अजित पवार यांना सुनेत्राताई पवार यांच्या विजयासाठी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अजितदादांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar met former Purandar MLA Dada Jadhavrao)

पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयबापूर शिवतारे यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना विरोध करत बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. बारामती हा कोणाचाही घरचा मतदारसंघ नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अजित पवार आणि शिवतारे या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्यस्थी केली होती. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

लोकसभेचे बिगुल वाजले; देशात सात टप्प्यांमध्ये मतदान, चार जूनला होणार मतमोजणी

त्यानंतर आता अजित पवार यांनी शिवतारे यांना बाजूला सारुन दादा जाधवराव यांची मदत घेण्याची रणनीती आखली आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून जनता दलाचा आणि दादा जाधवराव यांचा बालेकिल्ला होता. बारामतीच्या शेजारी हा मतदारसंघ असूनही दादा जाधवराव यांनी 1978, 1985, 1990, 1995 आणि 1999 असा पाच वेळा इथून विजय मिळविला. तर दोनवेळा त्यांचा पराभव झाला होता. मात्र 1980 साली त्यांचा अवघ्या 726 मतांनी पराभव झाला होता. तर 2004 साली त्यांनी जवळपास 50 हजार मते घेतली होती.

भाजप सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत, मोदींच्या सत्तेचं महाराष्ट्रातून पतन होणार; पटोलेंची घणाघाती टीका

दादा जाधवराव जुना हिशोबही सेटल करणार?

दादा जाधवराव आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण पुणे जिल्ह्याने पाहिला आहे. बारामतीच्या शेजारी हा मतदारसंघ असूनही जिंकता येत नसल्याची पवारांना खंत होती. त्याचवेळी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत दादा जाधवराव हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवत होते. त्यावेळी एका सभेत जाधवरावांवर टीका करताना ‘म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागेल’, असे आवाहन पवारांनी मतदारांना केले होते. त्या निवडणुकीत जाधवराव यांचा पराभव झाला होता. आता पवार यांच्या लेकीचा म्हणजेच सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी अजितदादांना मदत करुन दादा जाधवराव जुना हिशोबही सेटल करणार का हे पहावे लागणार आहे?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube