पाकिस्तानमध्ये लोकांची अन्नासाठी लूटमार

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan)अनेक दिवसांपासून लोकांना अन्न मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं येथील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटामुळं (financial crisis) निर्माण झालेल्या महागाईनं (inflation)पाकिस्तानमध्ये निराशा पसरली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोजगाराच्या संकटामुळं कुटुंबांसमोर भूकबळीचं संकट निर्माण झालं आहे. येथील लोकांकडं बाजारातून अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळं आता पाकिस्तानमधील जनतेनं लूटमार आणि […]

Islamabad

Islamabad

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan)अनेक दिवसांपासून लोकांना अन्न मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं येथील परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. आर्थिक संकटामुळं (financial crisis) निर्माण झालेल्या महागाईनं (inflation)पाकिस्तानमध्ये निराशा पसरली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोजगाराच्या संकटामुळं कुटुंबांसमोर भूकबळीचं संकट निर्माण झालं आहे. येथील लोकांकडं बाजारातून अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळं आता पाकिस्तानमधील जनतेनं लूटमार आणि अराजकतेचा अवलंब केला जात आहे. अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)दिसत आहेत. त्यात गरीब पाकिस्तानी लोक गव्हाच्या पिठाचा ट्रक लुटताना पाहायला मिळत आहेत.

इस्लामाबाद (Islamabad)आणि पाकिस्तानमधील पंजाबमध्येही (Panjab)हिच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्या व्हिडीओमध्ये वाहनांमधून गव्हाचे पोते लुटण्यामध्ये लहान मुलांसह महिलांचाही सहभाग असल्याचं दिसत आहे.

तक्रार करणारेच हक्कभंग समितीत Sanjay Raut यांचा ‘या’ नावांना विरोध!

व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलंय की, ‘लोकांनी स्नॅचिंग सुरू केली आहे. लोकांनी गव्हाचं पीठ लुटायला सुरुवात केली आहे. चालक आणि गव्हाचे पोते ओढणाऱ्यांचा बळी जातो आहे. येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोकांचा जमाव गव्हाच्या पोत्यानं भरलेला ट्रक लुटताना दिसत आहे. हा व्हिडिओ पंजाबमधील लाहोरचा आहे. अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये एक जमाव गव्हाची पोती घेऊन जाणारे वाहन लुटताना दिसतो आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आहे.

या व्हिडिओमध्ये लहान मुलांसह महिला देखील गव्हाची पोती घेऊन पळत असल्याचं दिसत आहेत. पाकिस्तानातील भीषण आर्थिक संकट आता अराजकतेला जन्म देत असल्याचं दिसत आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ रोज समोर येत आहेत. त्यामध्ये लोक लुटताना आणि खाण्यापिण्यासाठी भांडताना दिसत आहेत.

अनेक दिवसांपासून पाकिस्तानला गव्हाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. फक्त गव्हाचं पीठच नाही तर डाळी, भाजीपाला, तेल, फळंही लोकांच्या बजेटबाहेर गेल्याचं समोर आलं आहे.

Exit mobile version