Download App

आमच्यात मतभेद नाहीत, निर्णय सोबत बसूनच होईल; फडणवीसांनी क्लिअर केलं…

आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

Devendra Fadnavis : आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलंय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी काही एक अडचण नसल्याचं पंतप्रधान मोदींना सांगितल्याचा दावा केलायं. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय. मुख्यमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत होत्या. त्यावर बोलताना फडणवीसांनी क्लिअर सांगून टाकलंय.

भाजपने शिंदेंना पुन्हा CM करण्याचा शब्द दिला होता; शिवसेना नेत्याच्या दाव्याने मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सगळे एकत्रित आहोत एकनाथ शिंदे, अजितदादा किंवा मी. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत, आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं. सगळे निर्णय सोबत बसून होतील पक्षश्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील. कोणाच्या मनात किंतू-परंतू असेल तो शिंदेंनी दूर केला आहे. पुढच्या प्रक्रियेसाठी पक्षश्रेष्ठींसोबत आमची बैठक होणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा, शिंदे यांची माघार?

तसेच शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, निश्तिचपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितले होते की, सगळे निर्णय सोबत बसून होतील. आमचे वरिष्ठ असतील ते आमच्या सोबत बसून सर्व निर्णय घेतील. त्यामुळे मला असे वाटते की कोणाच्याही मनात किंतू परंतु असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी तो देखील दूर केला असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.

आयुष्मानने पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय कोणाला दिलं? म्हणाला,’त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली…’

मी कालच मोदींना फोन केला…
मी कधीही कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नाही, राज्यात माझी लाडका भाऊ अशी माझी ओळख आहे, मी पंतप्रधान मोदींना काल फोन केला, त्यांना सांगितलं की सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण आहे, असं वाटत असेल तर तुम्ही असं मनात आणू नका, तुम्ही निर्णय घ्या. एनडीएचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही निर्णय घ्या. आम्हाला तो निर्णय मान्य असेल. सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदेंची कोणतीही अडचण नसणार आहे, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.

follow us