नगर : नगर अर्बन बँक अपहार (Nagar Urban Bank Scam) प्रकरणातील आणखी एका आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज वासूमल मोतियानी (Manoj Vasumal Motiani) (वय ३४, रा. मारुती मंदिराजवळ, सावेडी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
महत्वाची बातमी! ‘नो चाळण, नो गाळण’, लाडकी बहीण योजनेची पडताळणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय
२९१ कोटींचा अपहार
नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा अपहार झाला असल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अखेर १७ आरोपींना ताब्यात घेतले होते. या घटनेतील फरार असलेल्या आणखी एका संशयित आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने संशयित आरोपी मनोज मोतियानी हा न्यायालयाला शरण आला. त्याला न्यायालयाने पाच दिवसाची (२८/७/२५ पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
3 कोटींची रक्कम मोतियानीच्या खात्यात वर्ग…
बँकेचा तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापकाने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल देऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, प्रवीण सुरेश लहारे याने ३ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ती रक्कम आरोपी मनोज वासुमल मोतियानी याच्या खात्यात वर्ग केल्याचं आणि त्यातून जागा खरेची केल्याचा आरोप आहे.
दरम्यान नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. त्यातील काही आरोपी हे जामीनावर बाहेर आहेत.
जामीनावर असलेले आरोपी
(१) प्रदीप जगन्नाथ पाटील, सावेडी, अहिल्यानगर,
२) राजेंद्र शांतीलाल लुणीया, राऊत मळा. कोठी रोड, अहिल्यानगर
३) मनेष दशरथ साठे, रा. सारसनगर कानडेमळा, अहिल्यानगर.
४) अनिल चंदुलाल कोठारी, रा. आनंद हॉस्पी. मागे माणोकनगर, अ.नगर
५) अशोक माधवलाल कटारिया, रा. बाजारपेठ, टाकळी ढोकेश्वर.
६) शंकर घनशामदास अंदानी, रा. भगतमळा, सावेडी, अ.नगर
(७) मनोज वसंतलाल फिरोदिया, आनंदपार्क, सारसनगर रोड, अ.नगर
८) प्रविण सुरेश लहारे, रा. एकनाथनगर, केडगाव, अ.नगर
९) अविनाश प्रभाकर वैकर, रा. सुदर्शन अपार्टमेंट, अहिल्यानगर
१०) अमित वल्लभराय पंडीत, रा.संगमनेर जि. अहिल्यानगर
११) अक्षय राजेंद्र लुणावत, रा. होलेवस्ती चौक, उंड्री, पुणे
१२) राजेंद्र केशव डोळे, रा. २२५, अर्चना अपा.. गुरुवार पेठ, सातारा
१३) डॉ. निलेश विश्वास शेळके, रा. स्टेशन रोड, अहिल्यानगर
१४) केशव भाऊसाहेब काळे, रा. सारोळा कासार, ता. नगर
१५) रविंद्र बबनराव कासार, रा. संवत्सर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर
१६) रविंद्र विठ्ठल जेजुरकर, रा. ममदापुर, ता. राहाता, जि. अहिल्यानगर
१७) रुपेश सुर्यकांत भन्साळी, रा. ए ११०२. गुलटेकडी पुणे