MP Election Result 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (MP Election Result 2023) निकाल उद्या 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण काही एक्झिट पोलमध्ये (Exit polls) मध्य प्रदेशचा कौल भाजपाच्या बाजून दाखवला आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (KamalNath) यांनी मोठे विधान केले आहे. आमचा मतदारांवर विश्वास आहे. एक्झिट पोलची चिंता करण्याची गरज नाही. निकाल लागल्यानंतर आम्ही उद्या चर्चा करू. आज काही बोलायची गरज नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचवेळी अपक्ष आमदारांशी संपर्क करण्याबाबत कमलनाथ म्हणाले की, याची आम्हाला गरज भासणार नाही, काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळणार आहे. त्यांच्याकडे एवढ्या जागा आहेत तर मग नाटक का करत आहे, अपक्षांशी चर्चा का करत आहेत? असा सवाल त्यांनी केला.
Chhattisgarh : उद्या निकाल, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं PM मोदींना पत्र; कारणही आलं समोर
काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्यानंतर भोपाळला पोहोचतील
याशिवाय इंदूर-1 चे काँग्रेसचे उमेदवार संजय शुक्ला यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, विजयानंतर काँग्रेसने सर्वांना भोपाळला येण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार विजयी होताच ते भोपाळच्या दिशेने कूच करतील. यावेळी पक्षाला 140 हून अधिक जागा मिळतील. यावेळी पक्ष मोठ्या मतांनी विजयी होणार असल्याचा दावा संजय शुक्ला यांनी केला आहे.
राजस्थानमध्ये हालचाली वाढल्या! गेहलोत यांच्यानंतर वसुंधरा राजेंनी घेतली राज्यपालांची भेट
काँग्रेसमध्ये फोडाफोडी होण्याची भीती आहे का?
पक्षात कोणत्याही प्रकारची तोडफोड होण्याची भीती नसल्याचे संजय शुक्ला यांनी सांगितले. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. सगळे भोपाळलाच जमतील. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला काँग्रेसचे सरकार हवे आहे.
रविवार 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेससह सर्व पक्षांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. मध्य प्रदेशातील सत्तेची कमान कोणता पक्ष हाती घेणार हे रविवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.