Download App

Mumbai Fire साकीनाक्यात पहाटे अग्नितांडव, २ कामगारांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

अंधेरी : अंधेरी (पू) येथील साकी नाका (sakinaka) मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या आगीत (Sakinaka Fire) आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. (Mumbai Fire) राकेश गुप्ता आणि गणेश देवासी अशी २ मृतांची नावे असल्याची माहिती मिळाली.

आग लागली तेव्हा दुकानामध्ये ११ कामगार झोपले होते. त्यापैकी ९ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवले असून अजूनही कुलिंग ऑपरेशन सध्या सुरु आहे. साकीनाका भागात आज पहाटे दोनच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर दुकान जळून खाक झालं. ही दुकानं साकीनाका मेट्रो स्टेशनच्या जवळच होती.

मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

राज श्री असं या दुकानाचं नाव आहे. तर ही आग एवढी भीषण होती की दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करुन ३:३० सुमारास आग नियंत्रणात आणली. यानंतर पहाटे ५ वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली. यानंतर परत काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंगचे काम सध्या सुरु आहे.

Tags

follow us