Download App

मुंबई उच्च न्यायालयात भरती, लॉ क्लर्क पदाच्या 50 रिक्त जागा भरणार

  • Written By: Last Updated:

सरकारी नोकरीच्या (Govt job) शोभात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) लॉ क्लर्क (Law Clerk) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात जाहीर करण्यात आलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक 1502/2019-20(Law Cleark)/2459 असा आहे. या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज बोलावण्यात आले आहेत. या पदांसाठी उमेदवार हे ऑफलाईन अर्ज करू शकतात. याची पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख हे 20 मार्च हीआहे. (Bombay High Court Recruitment 2023)

मुंबई उच्च न्यायालयातील लॉ क्लर्क पदांची भरती एकूण 5० पदांसाठी आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून लॉ विषयात ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करतांना उमेदवारांनी आपला रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे कागदपत्रे अर्ज करतांना जोडणे गरजेचं आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्याआधी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेली जाहीरात नीट काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज केल्यानंतर त्या अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास अर्ज बाद होईल, याची नोंद उमेवारांनी घ्यावी.

पदाचे नाव – लॉ क्लर्क

एकूण पदे – 50

शैक्षणिक अहर्ता
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक भरती 2023 नोटिफेशननुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवी धारण केलेली असावी.
55 % गुणांसह विधी पदवी (LLB) किंवा पदव्युत्तर पदवी (LLM) + संगणकाचे ज्ञान

वयोमर्यादा
लॉ क्लर्क भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पात्रता धारक उमेदवाराचं वय 21 ते 30 या दरम्यान असावे.

अर्जाचे शुल्क किती?
मुंबई उच्च न्यायालयाच्या लॉ क्लर्क भरतीसाठी अर्ज करण्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

नोकरी ठिकाण –
मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीमधील पात्र उमेदवारांनी मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे.

Maharashtra Budget 2023 : शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने मदत; फडणवीसांची घोषणा

कोणत्या ठिकाणी किती पदे?
1. मुंबई – 27
2. नागपूर – 09
3. औरंगाबाद – 14

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
रजिस्ट्रार (Personnel), उच्च न्यायालय, Appellate Side, मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल. टी. मार्ग, मुंबई – 400001

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2023
● या पदभरतीसाठी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळ : http://bombayhighcourt.nic.in/index.php

Tags

follow us