Download App

मोठी बातमी! काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी जोरदार चकमक; गोळीबारात 3 जवान शहीद

काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी ही मोहिम सुरू केली होती.

लोकसभेच्या खासदारांनी ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहावं; भाजपकडून तीन ओळींचा व्हिप

सुरक्षा दलाचे जवान या जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत होते. मात्र येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर काही वेळातच या मोहिमेचे रुपांतर गोळीबारात झाले. दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू झाला. जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याबाबत श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ट्विट करत घटनेची माहिती दिली.

कुलगाममधीन हलानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहित मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांबरोबर झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि उपचारादरम्यान ते शहीद झाले, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. ज्या ठिकाणी चकमक झाली तेथे आता सुरक्षा दलाच्या आणखी तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांना शोधून काढण्याची मोहिम आणखी तीव्र करण्यात आली आहे. याआधीही काश्मीरमध्ये लष्कर ए तौयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या तीन सदस्यांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते.

पकडलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, 10 राउंड पिस्तूल, 25 एक – 47 रायफल आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Tags

follow us