Download App

कराडवर मकोका, परळी बंद; पंकजा म्हणाल्या, ‘या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाहीत…’

मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळं इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचे काम माझ्यासाठी मॅटर करतं - पंकजा मुंडे

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde : खंडणी प्रकरणात अटकेत असलेला धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडव (Walmik Karad) मकोका (MCOCA) लावण्यात आला. आज त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने (Beed Court) ७ दिवसांची पोलिस कोठडी (Police custody) सुनावली. त्यामुळे कराड समर्थक आक्रमक झाले. काल परळी (Parali) बंद ठेवण्यात आली होती. तर, आज रस्ता रोको करत आंदोलन केलंय. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र या प्रकरणातून स्वत:ला लांब ठेवल्याचे पाहायला मिळालं.

‘गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन होणे हे गृहमंत्रायलाचे अपयश’; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा 

कराड यांचे समर्थक आक्रमक झाले असताना पंकजा मुंडेंना परळी बंद आणि वाल्मिक कराड बद्दल विचारले असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात हा विषय संपवला. मला ते काही माहिती नाही.  या गोष्टी माझ्यासाठी मॅटर नाही करत. माझ्यासाठी मॅटर करतं रोजचं काम, असं पंकजा म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बीडमधील कराड समर्थकांच्या आंदोलनाबाबत त्यांना विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी विमानात होते, त्यामुळे परळीमध्ये, बीडमध्ये जे काही सुरू आहे, त्याची मला कोणतीही माहिती नाही. मी नियोजित कार्यक्रमात आहे. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करत आहे. त्यामुळं इतर गोष्टी मला मॅटर करत नाहीत. रोजचे काम माझ्यासाठी मॅटर करतं, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून पंकजा यांनी या प्रकरणापासून लांब आपण असल्याचे संकेत दिलेत.

सुनीता विल्यम्स करणार चमत्कार, 12 वर्षांनंतर अंतराळात होणार ‘स्पेसवॉक’! 

मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. परळीत तणाव निर्माण झाला असेल तर निवळावा यासाठी मी गृहमंत्र्यांशी बोलेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

…म्हणून संतोष देशमुखची हत्या
दरम्यान, सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवदाच्या अधिकाऱ्यांना धमक्या देऊनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला.

कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी…
आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अखेर ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कराडला आज बीड जिल्हा न्यायालयात (Beed District Court) हजर करण्यात आले होते. यावेळी एसआयटीने वाल्मिकी कराडच्या पोलिस कोठडीसाठी ९ ते १० कारणे सादर केली. तर दुसरीकडे, वाल्मिकी कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि कराड यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

follow us