Santosh Deshmukh Murder Case : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता न्यायालयीन चौकशी (Judicial Inquiry) होणार आहे. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल. ताहलियानी (M.L. Tahliyani) ही एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे परभणी हिंसाचाराच्या वेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) प्रकरणाची देखील आता न्यायालयीन चौकशी होणार आहे. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी न्यायाधीश व्ही एल आचलिया (V L Achaliya) यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. दोन्ही समित्या सहा महिन्यात त्यांचा अहवाल देणार आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशीची देखील घोषणा केली होती. तर आता या प्रकरणात न्यायालयीन चौकशीसाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आले आहे. माहितीनुसार, या चौकशीचे मुख्यालय बीडमध्ये असणार आहे. तर या समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा अधिकार असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मुख्य संयशित आरोपी वाल्मिक कराडावर कारवाई मकोका लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात सखोल चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली होती.
भारतीय महिला संघाचा ‘डबल धमाका’ सर्वोच्च धावसंख्या करत मिळावला सर्वात मोठा विजय
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी एसआयटीमधील काही अधिकारी बदलण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर या एसआयटीमधील काही अधिकारी बदलण्यात आले आहे.