Samruddhi Mahamarg : गेल्या काही दिवसापासून विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg) तरुण-तरुणींकडून फोटो, रील्स काढण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृध्दी महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स (Reels) काढत असल्याचं आढळून आलं. यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेने याची गांभीर्याने दखल घेतली. समृद्धीवर हुल्लडबाजी करणार्यांना आता एक महिन्याचा तुरुंगवास आणि दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.
काही तरुण जीव धोक्यात घालून दौलताबाज रोडवरील समृद्धी महामार्गाच्या पुलावर चढून फोटो आणि रील्स काढत काढतात. त्याचा एक व्हिडिओही समोर आला होता. अनेकदा वाहन चालकही वाहन थांबून फोटो किंवा व्हिडीओ काढतात किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी रील्स बनवतात आणि त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. 80 ते 120 किमी प्रतितास वेगाने जाणाऱ्या वाहनांना अनेकदा अशा कृत्यामुळे अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता बळावते. म्हणून वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर आले. समृद्धी महामार्गावर असे कृत्य करणाऱ्या वाहनचालकांची दखल पोलिसांनी घेतली आहे. आता समृध्दी महामार्गावर रीलस् तसेच फोटो काढण्यासाठी मनाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश दिले.
सना खान प्रकरण सेक्सटॉर्शनच्या वळणावर! आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करायचा
पोलिसांनी सांगिलते की, आता समृध्दी महामार्गावर थांबून फोटो किंवा व्हिडिओ शुट केल्यास कलम 341 नुसार, एक महिना कारावास किंवा 500 रुपये दंड तसेच कलम 283 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धका किंवा इजा होईल असं कृत्य केल्यास 200 रुपये दंडाची शिक्षा ठोठावणयात येईल, असं महामार्ग पोलिसांनी सांगितलं आहे.
समृध्दी महामार्ग सुरू झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. हजारावर अपघात होऊनही आणि दीडशेच्यावर जीव जाऊनही प्रशासन कठोर पावलं उचलतं नव्हतं. मात्र आता प्रशासन सतर्क झालं आहे.