Download App

जितना दबाओगे, उतना उचलके सामने आयेंगे, Ravindra Tupkar यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

बुलढाणा : शेतकऱ्यांची चळवळ दाबण्याची आणि मला संपवण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असल्याचा गौप्यस्फोट शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तुपकर आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुपकर बोलताना म्हणाले, विविध मागण्यांसाठी सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरुन काही पोलिसांनी शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढा, अन् रविकांत तुपकरांचा एकदाचा गेम करुन टाका, असं सांगितल्याचा आरोपही तुपकर यांनी यावेळी केला आहे.

Viral Video : शाहरूखच्या ‘झूमे जो पठान’ गाण्यावर शिक्षिकेने विद्यार्थ्यांबरोबर केला डान्स; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस

मात्र, पोलिस आणि सत्ताधाऱ्यांचा हा डाव आम्ही उधळला असून मी संपणारा नाही. शांततेत सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांची ही लढाई आता थांबणार नसून मी शेतकऱ्यांसाठी फासावर जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय.

चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला ? महागाई शिखरावर

शेतकऱ्यांसाठी आता महाराष्ट्राभर एक यात्रा करुन सत्ताधाऱ्यांविरोधात पुरावे सादर करुन त्यांचं पितळ उघडं पाडणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच डॉ. आंबेडकर म्हणाले होते, हे बीज जमिनीत टाकलं तर याचं वृक्ष तयार होतं.

आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पंकज भुजबळांच्या लेकींची सुवर्ण कामगिरी

“जितना आप दबाओगे, उतना हम उचलके सामने आयेंगे” या शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. तुम्ही कितीही काहीही करा मात्र, मी संपणारा नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलंय. दरम्यान, काही सत्ताधारी नेत्यांकडून माझा गेम होणार असल्याचा आरोप करुन त्यांनी भविष्यात माझ्या जीवाला धोका असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Politics : ‘…पण मूर्ख व्यक्ती सत्तेत आली’, संजय राऊतांचं सूचक ट्वीट

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची घोषणा तुपकर यांनी केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन उधळून लावले होते. यावेळी करण्यात आलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी व कार्यकर्ते जखमी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांना त्यांना अटक केली होती. त्यानंतर आता पत्रकारपरिषद घेत रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करुन विरोधकांवर मला संपविण्याबाबत पोलिसांना सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Tags

follow us