Download App

आपण काहीतरी पाप केलयं; राऊतांनी सांगितली अजितदादांच्या मनातली सल

  • Written By: Last Updated:

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी टीका करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी अजितदादांना आतल्या आत खुपणारी गोष्ट सांगितली आहे. आपण काही तरी पाप केलंय, गुन्हा केलाय अशी सल अजित पवारांच्या मनात असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Aurangabad : मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी CM शिंदेंची ‘सुभेदारी’ 32 हजारांचा सुट अन् 300 गाड्या

राऊत म्हणाले की, अजितदादांनी केलेल्या कृत्यामुळे त्यांचे मन त्यांना खात आहे. आपण काही तरी पाप केलंय अशी भावना त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच त्यांनी आज (दि. 15) होणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले असतील असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधानांना हृदय नावाची गोष्ट आहे का?

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात देशाचे चार जवान शहीद झाले. त्यावर दुःख व्यक्त करण्याऐवजी देशाचे पंतप्रधान दिल्लीत भाजप कार्यालयात स्वतःवर फुले उधळून घेण्यात व्यस्त होते. या कृत्यानंतर पंतप्रधानांना ह्रदय नावाची गोष्ट आहे का? असा खोटक प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. शहीद झालेले सर्व जवान वरिष्ठ अधिकारी होते.

ठाकरे गटाला धक्का! आमदार वायकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. अशावेळी भाजपकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ही खेदजनक गोष्ट आहे. या बेगडी सनातनवाल्यांनी शहीदांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले का? असे म्हणत संसदेच्या विशेष सत्रात चर्चा जरा यावरही होऊ द्या असा सल्ला राऊतांनी केंद्र सरकारला दिला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही साधला निशाणा

यावेळी राऊतांनी उद्या (दि.16) छ.संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही जोरदार हल्लाबोल केला. मंत्रिमंडळ बैठकीसाठी इतका थाट कशाकरता? असा प्रश्न उपस्थित करत हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करायला हवा होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2016 मध्ये बैठक झाली त्यात अनेक घोषणा झाल्या. त्यावेळी 49 कोटींची घोषणा झाली होती त्याचा एक रुपया तरी मराठवाड्याला मिळाला का ? असा प्रश्नदेखील राऊतांनी विचारला आहे.

सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम

शाहंच्या दौऱ्यात अडथळे येऊ नये म्हणून जरांगेंचे उपोषण संपवले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छ. संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला असून, शाहंच्या दौऱ्यात अडथळे येऊ नये यासाठीच अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटलांचे उपोषण संपण्याचे आदेश केंद्राकडून आल्याचे रऊतांनी यावेळी सांगितले. अमित शाह आले नाहीत हा त्यांच्या शहाणपणाचा निर्णय असल्याचेही यावेळी राऊतांनी म्हटले आहे.

Tags

follow us