Download App

‘भोर’मध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका; शंकर मांडेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

Shankar Mandekar will file independent candidature : भोर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर (Shankar Mandekar) शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत मंगळवारी (दि. 29 रोजी) अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोर-राजगड-मुळशीची जागा ही शिवसेनेला (उबाठा) द्यावी, यासाठी शिवसैनिक आग्रही (Assembly Election 2024) होते. परंतु ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आलीय.

महाविकास आघाडीमध्ये ही जागा (Bhor) काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांनाच देण्यात आली. काँग्रेसला ही जागा देण्यात आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत मांडेकरांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी भोरमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत मांडेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधानसभेत रंगणार गुरू शिष्याची लढाई, मुंब्रात नजीम मुल्ला देणार जितेंद्र आव्हाडांना आव्हान

मुळशी तालुक्यात असणारा मांडेकर यांचा प्रभाव आणि भोर-राजगड या दोन्ही तालुक्यात संग्राम थोपटे यांच्याबद्दल असणारी नाराजी याचा फटका नक्कीच महाविकास आघाडीला बसणार असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी संग्राम थोपटे हेच विधानसभेते उमेदवार असणार आहेत, असं जाहीर केलं होतं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले होते. तसंच जिल्हाध्यक्ष शंकर मांडेकर यांनीही भोर मतदार संघामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजीत केले होते. त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपण या मतदारसंघासाठी दावेदार असल्याचं जाहीर केलंय. आता ते उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज ाखल करणार आहेत.

माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत

राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्ष फुटीनंतर दोन्ही पक्षामधील इच्छुकांची संख्या वाढली होती. संग्राम थोपटे यांनी आमदारकीची हँट्ट्रीक केलीय. या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र वेगळेच चित्र निर्माण झालंय. मतदार राज्याला खुश करण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन शक्कल लढवली जात असल्याचं दिसतंय. आता शंकर मांडेकर मैदानात उतरल्यामुळे आता संग्राम थोपटे यांच्यासमोर नवं आव्हान उभं ठाकलंय. त्यामुळे आता भोरची जनता कोणाला कौल देते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

follow us