Download App

वरवंड येथे नोकरी महोत्सव; ४५ कंपन्यांचा सहभाग, शरद पवारांनी तरुणांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

दौंड येथील वरवंड येथे नोकरी मेळाव्यात बोलताना शरद पावारांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सुविधांबाबत निर्मीती करण्याचं आश्वासन दिलं.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Address Jobs festival : आज देशभरात मला महाराष्ट्रातील लोक दिसतात. कोणतही काम करण्याची त्यांची तयारी असल्याने ते कष्ट करून अभिमानाने जगतात. त्यामुळे पडेल ती नोकरी करण्याची आणि देशातील कोणत्याही शहरात जाण्याची वेळ आली तरी आपण जाण्याच तयारी दाखवली पाहिजे. (Sharad Pawar ) कारण आपल्याकडं सर्वात मोठी अडचण आहे ती आपल्याला आपल्या घराजवळ, आपल्या शरहाजवळ किंवा आपल्या जिल्ह्यात नोकरी मिळाली तर बर होईल अशी मनस्थिती आहे. (Jobs) परंतु, तस न करता आपण कुठही जाऊन नोकरी करण्याची तयारी केली पाहिजे अस भाष्य राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते दौंड येथे वरवंड येथे आयोजित नोकरी महोत्सवात बोलत होते.

आम्ही चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागेल; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार

follow us