आम्ही चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागेल; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार

आम्ही चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागेल; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार

Sanjay Raut : आम्ही जर चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागंल अशी थेट टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut )  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तसंच, एकनाथ शिंदे यांचं स्व. आनंद दिघे यांच्याबद्दल काय मतं होतं हे फक्त आम्हालाच माहिती आहे त्यामुळे या असल्या (Dharamveer) चित्रपटांवर कुणी विश्वास ठेवण्यासारख नाही. तसंच, चित्रपट लबाडपट असून स्वत:च पाप लपण्यासाठी या चित्रपटांची निर्मीती करण्यात आली असा थेट घणाघातही संजय राऊतांनी यावेळी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मलाही चित्रपट काढायची इच्छा, पण अनेक जणांचे मुखवटे देवेंद्र फडणवीस  धर्मवीर2 वर काय बोलले?

आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखतो. आज आनंद दिघेंवर काहीजण स्वत:ची मालकी सांगत आहेत. सिनेमा-नाटकं काढतायेत. मात्र, आनंद दिघेंच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आणि मतं होती हे आम्हाला माहिती आहे. आम्ही जर त्यावर सिनेमे काढले तर तोंड लपवून फिरावं लागेल. आज गुरुपोर्णिमा आहे त्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलंय, सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघेंना गुरू मानून त्यांचे खोटे चित्र समोर आणत असतील तर तो आनंद दिघेंचा अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरू बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता फटकारलं आहे.

दोघांचं हिंदुत्व एकच

आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्य घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल पण भविष्यात तुम्हीसुद्धा या आगीचे चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिला आहे. आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं ते वेगळं नव्हतं. बाळासाहेबांचं हिंदुत्वच आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं. हिंदुत्वाच्या ज्या काही वेगळ्या चुली मांडल्यात त्या आनंद दिघेंनीही कधी मान्य केल्या नसत्या. हे चित्रपट बोगस आणि भंपक आहेत असा घणाघातही राऊतांनी यावेळी केला आहे. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशाप्रकारचे चित्रपट याआधी आले आहेत. काश्मीर फाईल्स भाजपाच्या लोकांनी काढला असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

मग दुसरा भाग कसा? आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

जे खोटे आहे त्याची चिंता आपण का करायची? पहिल्या चित्रपटात आनंद दिघेंचा महानिर्वाण दाखवला आहे मग त्यानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो? असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे. मात्र, विधानसभा निवडणुका आहेत. खोट्याला उजाळा द्यायचा आहे. आपल्या बेईमानीवर तारे चमकवायचे आहेत. त्यामुळे आनंद दिघेंसारखे महान निष्ठावान शिवसैनिकाचा, शिवसेना नेत्याचा वापर करायचा हे त्यांचं काम आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आपल्या खोट्या भूमिकांना सत्याचा मुलामा देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला ते सर्व चुकीचं आहे अशी टीकाही संजय राऊतांनी धर्मवीर २ या सिनेमावर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube