मुंबई : उभ्या हिंदुस्थानंचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव साजरा होत आहे. शिवजयंतीचा उत्साह प्रत्येक मराठी बांधवाच्या चेहऱ्यावर देखील दिसून येत आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवरायांना मानवंदना दिली आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईतील इस्राईलचे राजदूत (Ambassador of Israel) कोबी शोशनी यांच्यावतीनेही शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, अशी ओळख असणारे शिवराय हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. अवघ्या बाराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेण्यापासून ते महाराजांच्या राज्यभिषेकापर्यंत अनेक शत्रूंवर राजांनी मात केली. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
दिल्लीतील ऐतिहासिक आग्रामधील लाल किल्ल्यात आज शिवजयंती साजरी होत आहे.केंद्रीय पुरातत्व विभागाने यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आग्र्यातील लाल किल्ल्यातील दिवान ए आम सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
On the birthday of Chhatrapati Shivaji Maharaj here is a small surprise from the Israeli Diplomats in Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्ताने ,मुंबईतील ईजराईल च्या राजदूतांकडून महाराजांना मानवंदना#ShivajiMaharaj #shivajijayanti #shivajimaharajjayanti pic.twitter.com/3BPTTcY1UX
— 🇮🇱 Israel in Mumbai (@israelinMumbai) February 18, 2023
दरम्यान, इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील शिवजयंती सोहळ्याचा व्हिडीओ ट्विट करत या व्हिडीओच्या माध्यमातून इस्राईलच्या राजदूतांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपला सोडलं, हिंदुत्व नाही.., Uddhav Thackeray यांचा घणाघात