Download App

अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा

कल्याण : “ही युती एका विचारने झाली आहे. स्थानिक पातळीवर काही गोष्टी घडत असतात. त्याचा युतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणतं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे” यांनी मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये झालेला वाद हा अत्यंत किरकोळ असल्याचं म्हटलं आहे. ते कल्याण पूर्वमधील लोकग्राम उड्डाण पुलाच्या भूमिपुजनानंतर बोलतं होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेतील वादावर पडदा पडला असल्याच चित्र आहे. (Shivsena MP Shrikant Shinde talk on BJP and Kalyan Lok sabha Constituncy Controvorsy)

मागील काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं चित्र होतं. भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी एका महिलेने मानपाडा पोलिस स्थानकात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र हा गुन्हा दाखल होताच भाजपच्या वतीने मानपाडा पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली.

Kunal Raut हटाव मोहिम; युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा, खुर्च्यांची फेकाफेकी

याप्रकरणी कोणतीही सखोल चौकशी न करता पोलिसांनी हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचा दावा भाजपने केला. पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असाही आरोप करण्यात आला. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मात्र बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे कोणतेही काम करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. तसा ठरावचं एका बैठकीत मंजूर केला. यावर रवींद्र चव्हाण यांनीही कार्यतर्त्यांच्या मताचा सन्मान राखण्याची भूमिका घेतली. यावरुन काही जण युतीत मिठाचा खडा टाकतं आहेत, असा आरोप करत श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली.

अमित शाहंपर्यंतही पोहचला होता वाद?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. शिंदे यांनी भेटीची कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. अशातच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, मी छोटा कार्यकर्ता आहे, शाह गृहमंत्री आहेत. दिल्लीत अनेक काम असतात, पाठपुरावा असतो, अनेक भेटी असतात. खासगी कामही असतात, ती तुम्हाला नाही सांगू शकत, असं म्हणतं शाहंची भेट खासगी कामासाठी होती असं सांगितलं. मात्र या भेटीनंतरच कल्याणमधील वाद काहीशा शांत झाला आहे. त्यामुळे शांहच्या भेटीत या वादावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

Tags

follow us