मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे गाणं मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता हे प्रेमगीत तेलुगू आणि तामिळ भाषेतही आपल्या भेटीला आलं आहे. तेलुगूमध्ये हे गाणं चंद्रबोस यांनी लिहिलं आहे. तर तामिळमध्ये युगभारती यांनी शब्दबद्ध केले आहे. अनुराग कुलकर्णी आणि अदिती भावराजू यांनी गायलं असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तर मराठीत हे गाणं आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलं असून वैभव देशमुख यांनी लिहिलं आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे.
Rakul Preet Singhचे कंडोम विषयीचे ‘ते’ विधान चर्चेत
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील ‘गुन गुन’ या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने अल्पावधीतच संगीतप्रेमींना आपलंस केलं. सोशल मीडियावर या गाण्याला ३ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक तरूण तरूणी आपल्या प्री वेडिंग शूटसाठीही या गाण्याचा वापर करत आहेत.
या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.