Download App

Legislative Council Election : तांबेंमुळे नाराज झालेले Nana Patole नागपूरमुळे खूश

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी अगोदर प्रमुख उमेदवार आणि नेत्यांनी विजयाबद्दल दावे करत होते. भाजप (BJP) समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवणार, याकडे सर्व शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष वेधले. हॅट्ट्रीक अगोदरच नागो गाणार यांची मोठी विकेट पडली. याठिकाणी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सुधाकर अडबोले (Sudhakar Adbole ) विजयी झाले. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नागपूरच्या निकालावर खुश झाले.

नागपूर मतदारसंघात ६ जिल्ह्यात सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजनी येथील समुदाय भवनात सकाळी ७:३० वाजता मतपेट्या बंद केलेली आणि स्ट्राँगरूम उघडण्यात आल्या. प्रत्यक्ष मतमोजणी ही सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली. त्या अगोदरच निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदींना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या नागपूर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले हे विजयी झाले.

या विषयीची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा भाजपला दणका बसला, अशा शब्दात भाजपवर टीका केली. दरम्यान नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण २८ टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. यानंतर, उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Tags

follow us