काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या भाजपच्या गुंडांना तत्काळ अटक करा; वर्षा गायकवाड आक्रमक

भाजपच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाबद्दल भाजपची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे

Varsha Gaikwad

Varsha Gaikwad

मुंबई : भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अवमान केला. त्यावर माफी मागण्याऐवजी भाजप गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपच्या (BJP) खासदारांनी दादागिरी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केला, हा सत्तेचा माज असून अशा भ्याड हल्ल्याला काँग्रेस कार्यकर्ते आणि आंबेडकरी जनता भिक घालत नाही. सरकारने या गुंडांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे.

संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपाने मारहाण.., पॉस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे 

वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. भाजपच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित, आदिवासी समाजाबद्दल भाजपची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली आहे. अमित शाह आणि भाजपाने यावर माफी मागितली नाही, तर उलट भाजपचे लोक गुंडगिरी करत आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना कसलीही तमा न बाळगता सरकारने तातडीने अटक केली पाहिजे, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.

‘खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना’; संसदेतल्या राड्यानंतर खर्गेंचं स्पष्टीकरण… 

पुढं त्या म्हणाल्या की, भाजपच्या गुंडगिरीला त्याच भाषेत उत्तर देण्याची धमक काँग्रेसमध्ये आहे. पण काँग्रेस अहिंसेचा मार्ग अवलंबत नाही. पण कोणी आमच्यावर हल्ला करत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. सरकारने तात्काळ या गुंडांवर कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार असेलस हे लक्षात ठेवा असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

Exit mobile version