Sunetra Pawar On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्वदूर परिचित आहेत. एवढेच काय तर, अजित पवारांनी राजकीय वर्तुळात दादा नावाने ओळखले जाते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, अजित पवारांना (Ajit Pawar) त्यांच्या पत्नी घरात नेमकं कोणत्या नावाने हाक मारत असतील? तुमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या याच प्रश्नाचं उत्तर खुद्द सुनेत्रा पवार यांनी दिलं आहे. पुण्यात शिवाजीनगर येथे ‘श्रमण’ या नवीन विधी कार्यालयाचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांनी केले. त्यावेळी सुनेत्रा विहिनींनी अजित पवारांच्या घरातील नावाचं गुपित उघडलं आहे.
आता खूप होतयं, कोकाटेंचा निर्णय घ्याच; रोहित पवारांची दादा अन् फडणवीसांकडे थेट मागणी
अजितदादांबद्दल प्रश्न अन् सुनेत्रा पवारांच्या उत्तराने पिकला हशा
सुनेत्रा पवार एका कार्यक्रमाला उपस्थि होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या मंचावरून खाली उतरत होत्या. मात्र, त्याचवेळी मंचावरून एक आवाज आला वहिनी एक प्रश्न विचारायचा होता. हे ऐकताच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) दोन मिनिटं थबकल्या. त्यावेळी हातात माईक असलेल्या निवेदिकेने संपूर्ण महाराष्ट्र अजित पवारांना लाडाने दादा म्हणून संबोधतो. पण तुम्ही त्यांना घरी काय नावाने हाक मारता? असा प्रश्न विचारला.
Video : फडणवीसांच्या पोटातलं ओठांवर आलचं; शिंदे अन् दादांचे अवगुण थेट सांगून टाकले
अन् पिकला हशा
सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर देण्यापूर्वीच मंचासमोर उपस्थित असेलेल्यांनी दादा असे उत्तर दिले आणि एकच हशा पिकला. त्यानंतर आम्हीदेखील घरी अजित पवारांना दादाच म्हणतो. कारण सगळेच जण त्यांना दादा म्हणतात आणि मुख्य म्हणजे आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली आहे असे म्हटले आणि फुन्हा एकदा सुनेत्रा पवारांसह सर्वांमध्ये हशा पिकला. पण एकूणच काय तर, राजकीय वर्तुळात जसा अजित पवारांची ‘दादा’गिरी दिसून येते त्याचप्रमाणे घरातही त्यांना उद्देशून मारली जाणारी हाक लक्षात घेता घरातही अजित पवार दादाचं आहेत हे अधोरेखित होते.
सुनेत्रा वहिनींनी फोडलं अजित पवाराचं घरातलं नाव…! #AjitPawar #SunetraPawar @AjitPawarSpeaks @SunetraA_Pawar @supriya_sule @RRPSpeaks @ChakankarSpeaks pic.twitter.com/T8DDCNB7ZV
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 2, 2025