Download App

पाकिस्तानी एन्फ्लुएन्सर सना युसुफचा घरात घुसून खून; ‘हे’ खळबळजनक कारण आलं समोर

सना युसूफ ही अवघ्या 17 वर्षांची होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून तिच्यावर

Pakistan Sana Yusuf Murder Case : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे (Murder) एका 17 वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलाय. या खुनामुळे पाकिस्तानच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. खून झालेल्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचे नाव सना युसूफ असे आहे.

सना युसूफ ही अवघ्या 17 वर्षांची होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. याच गोळीबारात तिचा मृत्यू झालाय. हा प्रकार घडल्यानंतर सनाची आई फरजाना युसूफने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पाकिस्तान दंड संहितेच्य कलम 302 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IMF कडून कर्ज घेण्यात पाकिस्तान नाही हा देश अव्वल; भारतही कर्जदार, जाणून घ्या..

सना युसुफचं टिकटॉकवर साधारण आठ लाख तर इन्स्टाग्रामवर साधारण 5 लाख फॉलोअर्स होते. दाखल एफआयआरनुसार हल्लेखोर तरुण संध्याकाळी साधारण 5 वाजता तरुणीच्या घरात घुसला. त्याने हत्येचा उद्देश ठेवून सना युसूफवर थेट गोळीबार केला. यात दोन गोळ्या तिच्या पोटत घुसल्या. सना या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात तातकडीने दाखल करण्यात आलं. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार सना युसूफ आणि गोळ्या झाडणारा हल्लेखोर हे एकमेकांना ओळखत होते. हल्लेखो आणि सना यांच्यात संवाद झाला होता, असं सनाच्या काकूने सांगितलं आहे. ‘तू इथून निघून जा. इथे चरही बजूने कॅमेरे आहेत. मी तुला पाणी आणून देते, असं सना हल्लेखोराला म्हणाली होती, असा दावा सनाच्या काकूने केला आहे. दरम्यान, सनाच्या काकूने दिलेल्या या माहितीनंतर सनाच्या खुनासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

follow us