धक्कादायक! पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीचा ताफा अडवला; लाठ्याकाठ्यांनी हल्ला

धक्कादायक! पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या मुलीचा ताफा अडवला; लाठ्याकाठ्यांनी हल्ला

Pakistan News : पाकिस्तानातील कराचीतून सिंधमधील नवाबशाह (Pakistan News) येथे निघालेल्या असीफा भुट्टो यांच्या वाहनांच्या ताफ्याला आंदोलकांनी घेराव घातला. असीफा भुट्टो जमशोरो प्लाझा येथून चाललेल्या असतानाच काही आंदोलकांनी त्यांना रोखलं. लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे येथील वातावरणात तणाव निर्माण झाला. आंदोलनकारी पाकिस्तान सरकारच्या कालवा प्रकल्पाचा जोरदार विरोध करत आहे.

वादग्रस्त कालवा प्रोजेक्ट आणि कार्पोरेट फार्मिंगच्या विरोधात आंदोलन करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सुरक्षा दलांनी तत्काळ कार्यवाही करत असीफा जरदारांचे वाहन सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच त्यांच्या ताफ्यातील अन्य वाहनांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार सिंध स्थित जमशोरोचे एसएसपी जफर सिद्दीक यांनी सांगितलं की ताफा एक मिनिटांपेक्षाही कमी वेळ रोखून धरण्यात आला होता. यात कोणतेही नुकसान झालेले नाही. या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. जर कुणीही सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

 

पाकिस्तानवर मोठ्या कारवाईची तयारी! FATF च्या ग्रे लिस्टमध्ये जाणार अतिरेक्यांचा पोशिंदा..

जमावाने गृहमंत्र्यांचं घर जाळलं

दरम्यान, पाकड्यांची चोहो बाजूने कोंडी सुरू आहे. एकीकडे सिंधू नदीचे पाणी भारताने अडवले आहे. तर दुसरीकडं सरकारच्या सहा कालवे प्रकल्पाला सिंध प्रांतातील लोकांचा प्रचंड विरोध सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचं नौशहरो जिल्ह्यातील घर आंदोलकांनी जाळलं. त्यांच्या घराची मोठी नासधूस करण्यात आली. आंदोलकांच्या हाती यावेळी बंदुका होत्या. या बंदुकातून अनेकांनी हवेत गोळीबार केला. आंदोलकांनी यावेळी शेकडो वाहनं पेटवून दिली.

सिंध प्रांतात आंदोलन अधिक चिघळलं

चोलिस्तान कालव्याचा मुद्दा पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेतृत्वातील सिंध सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वादाचा मुद्दा आहे. शाहबाज शरीफ सरकार चोलिस्तानमधील वाळवंटात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयोग राबवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सिंधू नदीवर सहा कालव्याची निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. पण पीपीपी आणि सिंध प्रांतातील राजकीय दल त्याला कडाडून विरोध करत आहेत.

त्यातच भारताने सिंधुचे पाणी अडवल्याने सिंधमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी आंदोलक संतप्त झाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, चोलिस्तान कालवा प्रकल्पासाठी अंदाजे 211.4 अब्ज रुपयांचा खर्च येईल. त्यामाध्यमातून हजारो एकर नापीक जमीन शेतीयोग्य होईल. त्यातून मोठे उत्पन्न घेता येईल. 400,000 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पण सिंध लोकांसाठी ही पण एक डोकेदुखी ठरणार आहे.

सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube