Download App

छत्तीसगडमध्ये सत्तांतर; काँग्रेसचं नेमकं काय चुकलं?

Chattisgharth Election Result : छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला दे धक्का दिलायं. भाजपने 54 जागांवर आघाडी घेत काँग्रेसला धूळ चारलीयं. काँग्रेसच्या पदरात अवघ्या 33 पडल्या आहेत. तर इतर उमेदवारांनी 3 जागांवर आघाडी घेतलीयं. एकूणच छत्तीसगडमध्ये आता भाजपलाच बहुमत असल्याचं स्पष्ट झालंयं. मात्र, प्रस्थापित काँग्रेसच्या हातातून सत्ता कशी निसटली? काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? याबाबत आपण जाणून घेऊयात….

Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसच्या ‘या’ चुका ठरल्या भाजपच्या विजयाची कारणं…

छत्तीसगड प्रदेश काँग्रेसमध्ये आणि मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा नेहमीच चर्चेत राहिला आहे. भूपेश बघेल सरकारच्या काळात अनेक घोटाळे, गैरव्यवहार झाल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवण्यात आला होता. भूपेश सरकारच्या काळातला मद्य घोटाळाही चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे विरोधकांकडून काँग्रेस सरकारला सळो की पळो केल्याचं पाहायला मिळालं.

एवढंच नाहीतर भूपेश बघेल यांच्याविरोधात हाय कमांड नेत्यांककडे तक्रारी करुनही दखल न घेण्यात आल्याने त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. 2018 साली काँग्रेसची सत्ता आली. भुपेश बघेल यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. अडीच वर्षांनी मुख्यमंत्री बदलण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

KCR यांचे काय चुकले? राष्ट्रीय राजकारणात जात असतानाच स्वतःच्याच राज्याकडे केलेले दुर्लक्ष!

बघेल सरकारला महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरण चांगलच शेकलं. भ्रष्टाचार आणि महादेव बेटिंग अॅप प्रकरणी भाजपने आक्रमक प्रचार केला, या प्रकरणाचे धागेदोरे बघेल यांच्याशी जोडले असल्याचा दावाही करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसला ठोस स्पष्टीकरण देता आलं नसल्याने त्याचा फटका बसल्याचंही सांगण्यात येत आहे. बघेल सरकारच्या काळात राज्यात विकासकामांचा जोर कमी असल्याचंही सांगितलं गेलं.

ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुलीवरून घेरणाऱ्या खासदार कोल्हेंनाही पोलिसांचे थेट उत्तर; आपण जबाबदार लोकप्रतिनिधी…

दरम्यान, भाजपने राम मंदिर, हिंदुत्ववाद, आणि आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती केल्याचा परिणाम छत्तीसगडसह इतर राज्यातील निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे भाजपला तीन राज्यांत मुसंडी मारण्यात यश मिळालंय.

छत्तीसगडमध्ये एकूण 90 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत मतदान पार पडलं. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात एकूण 1 कोटी 55 लाख 61 हजार 460 मतदारांना मतदानाचा हक्क बजावला होता. छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच 75.8 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे पुरुष मतदारांपैकी महिला मतदारांचा अधिक कल यंदाच्या मतदानात दिसून आला आहे.

Tags

follow us