Download App

Maharashtra Assembly Election : अभिजीत बिचकुलेंना बारामतीकरांनी नाकारले 7 फेरी अखेर फक्त 27 मत

Maharashtra Assembly Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी घेतली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Election) अजित पवार यांना सातव्या फेरी अखेर 34020  मतांची आघाडी आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले (Abhijit Bichukule) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे अभिजीत बिचकुले बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि अजित पवार यांच्या विरोधात किती मत घेणार याबाबत राज्यात अनेक चर्चांना उधाण आले होते.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अभिजीत बिचकुले यांना सातव्या फेरी अखेर फक्त 27 मते मिळाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर अभिजीत बिचकुले प्रचारासाठी विधानसभा मतदारसंघात फक्त तीन वेळा आले होते.

Maharashtra Assembly Election : पुण्यात ‘तुतारी’चा आवाज बसला; दिग्गजांची पिछाडी कायम

अभिजीत बिचकुले नेहमी सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत रहातात. अभिजीत बिचकुले यांनी यापूर्वी वरळी आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. अभिजीत बिचुकलेंनी 2019 मध्ये वरळी विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढवली होती आणि त्यानंतर कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक देखील त्यांनी निवडणूक लढवली होती.

follow us