Maharashtra Assembly Election : पुण्यात ‘तुतारी’चा आवाज बसला; दिग्गजांची पिछाडी कायम
Maharashtra Assembly Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या दोन्ही आघाडीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
सध्या समोर आलेल्या कलानुसार महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. पुण्यात देखील महायुतीने जोरदार मुसळी घेत शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. पुण्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
माहितीनुसार, पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर ,कसबा या चार मतदारसंघात भाजप आघाडीवर आहेत तर हडपसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर, वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसचे रमेश बागवे पुढे आणि खडकवासल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवर आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरी अखेर हेमंत रासने यांनी 12740 मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत कसबाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 640 मतांची आघाडी घेतली होती. तर शिवाजीनगरमध्ये आठवी फेरी अखेर सिद्धार्थ शिरोळे यांनी 14429 मतांची आघाडी घेतली आहे.
तर मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके यांना 33984 मतांची आघाडी मिळाली आहे. तर दुसरीकडे पिंपरीत अण्णा बनसोडे आघाडीवर आहे. त्यांनी सहाव्या फेरीत4581 मते घेतली आहे तर सुलक्षणा धर यांनी 3657 मतांची आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरी अखेरीस अण्णा बनसोडे हे 16096 मतांनी आघाडीवर आहे.
महायुतीचे हेमंत रासने 5443 मतांनी पुढे…, पुणेमध्ये कोणाची आघाडी अन् कोणाची पिछाडी?
तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे यांनी आठव्या फेरीनंतर 16395 मतांची आघाडी घेतली आहे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील 24339 मतांनी आघाडीवर आहे.