Kasba Assembly By Election : कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात अभिजीत बिचकुलेच्या पत्नीची एंट्री

Kasba Assembly By Election : कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात अभिजीत बिचकुलेच्या पत्नीची एंट्री

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly By Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्यासाठी सर्वच पक्षाने हालचाली सुरु केल्या आहेत. यातच काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी सारखे पक्ष आपले उमेदवार या निवडणुकीत उतरवीत असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचकुले (Abhijit Bichukale) यांच्या पत्नीने या निवडणुकीच्या रिंगणात एंट्री केली आहे.

आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरुन कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे अभिजित बिचुकले कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या जागेसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार असून 2 मार्चला निकाल घोषित केला जाणार आहे.

अभिजित बिचुकले यांची पत्नी अलकृंता बिचुकले यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. त्यामुळे आता अभिजित बिचुकले पोटनिवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. अभिजित बिचुकले हे सातत्याने त्यांचा फॅशन सेन्स, स्टाईल आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

दरम्यान सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्जाचे वाटप सुरु आहे. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष या जागेवरुन लढण्यास उत्सुक आहेत. यातच हे पक्ष आज आपला उमेदवार देखील जाहीर करण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी धावाधाव
कसबा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह विविध इतर पक्ष आणि अपक्षांनी अर्ज नेले आहेत. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केलेला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube