Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ फलटणमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना पवार साहेब राजकारणातून निवृत्त झाल्यावर हाच पठ्ठ्या कामं करणार, बाकी कुणाचाच घास नाही. असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. ते आज फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील टीका केली.
या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, परवा बारामतीमध्ये भाषण करताना साहेबांनी सांगितलं की माझी मुदत संपल्यावर मी बाजूला होणार. ते राजकारणापासून दूर राहिले तर काम कोण करणार? हाच पठ्ठ्या काम करणार. दुसऱ्याला घास नाही. तिथं आपलं नाणं खणखणीत आहे, मी अजून 10 वर्ष वर्षे काम करणार. असं अजित पवार म्हणाले. तसेच बैल म्हतारा झाला, आता त्यांना बाजार दाखवा असं काही जणांनी म्हटलं होतं पण मला त्या खोलात जायचं नाही असं देखील अजित पवार म्हणाले.
माझ्याशी फलटणचे नेते म्हणतात की, आम्हाला फलटणचा बारामती करायचा आहे. पण बारामती करणं एवढं सोपं नाही. ते श्रीमंतांना विचारावं लागेल. असेही अजित पवार म्हणाले. तसेच या सभेत बोलताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्याच्या बदल्यात माढा लोकसभेची जागा भाजपकडे मागितली होती असं अजित पवार म्हणाले. अमितभाईंना भेटून मी सांगितलं होतं की सातारा सोडतो, तुम्ही मला माढा द्या, पण त्या ठिकाणी रणजित निंबाळकर आहेत असं अमितभाईंनी सांगितलं. असं अजित पवार यांनी या सभेत बोलताना म्हणाले.
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला त्यांची जागा दाखवा – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
तसेच माझ्या दिल्लीमध्ये ओळखी आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला करुन देणार. केंद्राचा पैसा हा मोठे प्रकल्प होण्यासाठी आणावाच लागतो आणि त्यासाठी सत्ता हवीय असं अजित पवार म्हणाले.