मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला त्यांची जागा दाखवा – आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
Sambhajirao Patil Nilangekar : मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प (Water Grid Project) मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद केली होती.परंतु नंतरच्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न सुटला नाही. आघाडी सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले. या आघाडीला त्यांची जागा दाखवून द्या,असे आवाहन माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी केले.
पाण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक असून त्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी आ.निलंगेकर यांनी मतदारसंघातील डोंगरगाव, तळेगाव,बोरी,हालकी,बेवनाळ, बेवनाळवाडी,सावरगाव, हिप्पळगाव,थेरगाव,रापका, जोगाळा,आरी,बिबराळ,बाकली, राणी अंकुलगा,घुग्गी सांगवी व सांगवी येथे भेटी दिल्या.
यादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आ.निलंगेकर बोलत होते. त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,माजी जिप सभापती गोविंद चिलकुरे, संगायोचे अध्यक्ष अनिल शिंदे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील,माजी जिप सदस्य ऋषिकेष बद्दे,नागनाथ चलमले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,नवनाथ डोंगरे,शहराध्यक्ष विनोद धुमाळे,महिला आघाडीच्या जगदेवीताई सुगावे, सरपंच कालिंदाताई काळे, उपसरपंच भालचंद्र पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक पाटील,माजी पोलीस पाटील तात्याराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की,राज्यात काम करत असताना लातूर आणि मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता.सरकारने त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून निधीची तरतूद केली होती.हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज दुष्काळाची समस्या मिटली असती.आ. निलंगेकर म्हणाले की,नंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे दुष्काळ व पाण्याची समस्या अद्यापही तशीच आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व नदी-नाल्यातून बारा महिने पाणी वाहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळ मुक्तीसाठी आगामी 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रगतीसाठी काम केले. यापुढेही हे काम. आपण करतच राहणार आहोत मतदारसंघात विकास कामे करताना अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे उपक्रम आपण सातत्याने राबवले आहेत.
मतदारसंघातील महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेत त्यांना लाभ मिळवून दिला आहे.भविष्यात स्त्री शिक्षणासाठी आपण काम करणार आहोत. प्रत्येक गावाच्या विकासासाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचेही आ. निलंगेकर म्हणाले.
फडणवीसांनी घेतली मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची भेट, नेमकं कारण काय?
यावेळी रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे, तालुकाध्यक्ष संदीप कांबळे, निलंगा शहराध्यक्ष विनोद सुरवसे, शहर उपाध्यक्ष लहू ढेरे,महिला आघाडीच्या जगदेवीताई सुगावे,उपसरपंच प्रीतम माने,भागवत गोळेगावे, कृष्णाजी तेलंगे,सरफराज पठाण, अमोल भुसागरे,सद्दाम शेख,जहीर शेख,मौला शेख यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.