Download App

मोठी बातमी! विधानसभेच्या तोंडावर MIM मध्ये मोठी फूट, कार्याध्यक्ष गफार कादरींचा राजीनामा

Gaffar Quadri Resignation : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, एमआयएमचे कार्याध्यक्ष गफार कादरी

  • Written By: Last Updated:

Gaffar Quadri Resignation : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला (AIMIM) मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, एमआयएमचे कार्याध्यक्ष गफार कादरी (Gaffar Quadri) यांनी राजीनामा दिला आहे. गफार कादरी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती आज त्यांनी एमआयएमला मोठा धक्का देत राजीनामा दिला आहे. त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

गफार कादरी औरंगाबाद पुर्व मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. या मतदारसंघातून दोन वेळा त्यांचा पराभव झाला आहे. औरंगाबाद पुर्व मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा अतुल सावे (Atul Save) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अतुल सावे भाजपकडून (BJP) या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्रा विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमकडून पाच जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील, सोलापूरमधून फारुख शब्दी (Farooq Shabdi) , धुळ्यातून फारूख शाह (Farooq Shah) , मालेगावमधून मुफ्ती इस्माईल (Mufti Ismail) आणि मुंबईतून फैयाज अहमद खान (Faiyaz Ahmad Khan) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर पुढील काही दिवसात बीड, नांदेडसह इतर काही मतदारसंघात एमआयएमकडून उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर एमआयएम आणि महाविकास आघाडीमध्ये देखील युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलीस कमिश्नर भाजपचा अजेंडा राबवतात, कारवाई करा नाहीतर …, आमदार धंगेकरांचा इशारा

follow us