Ashish Shelar : महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा फॉर्म्युला 11 तारखेला जाहीर होणार आहे. त्याआधी पुन्हा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकादा मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केल्याने काँग्रेस (Congress) कैचीत सापडली. यावेळी त्यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असे बोललेलो नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला. यावरून आता भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे पिता-पुत्रांची खिल्ली उडवली.
बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक टक करून मुख्यमंत्रीपद मागतात, अशी खोचक टीका शेलारांनी केली.
महाठगांचे गौरव गीत !!
बाप – बेटे हल्ली दारोदारी फिरतात
दारावर टक-टक करुन मुख्यमंत्रीपद मागतातआगे जाव.. आगे जाव..आज नही कल
“जाणते जण” तर म्हणतात, चल हट निघ चलकटोरा घेऊन दोघे भाषणबाजी करतात
उगाच मोदी- शहांना ठग म्हणून लक्ष लोकांचे वेधतातकटकमिशन ज्यांनी कोविडमधे बॉडी बॅगचे…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 9, 2024
आशिष शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांनी ‘महाठगांचे गौरव गीत’ या नावाची एक कविता पोस्ट केली असून त्यातून त्यांची खिल्ली उडवली. शेलारांनी लिहिलं की, बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक टक करून मुख्यमंत्रीपद मागतात! आगे जाव… आगे जाव.. आज नही कल; जाणते जण तर म्हणतात, चल हट चल निघ! कटोरा घेऊन दोघे भाषणाबाजी करतात, उगाच मोदी- शहांना ठग म्हणून लक्ष लोकांचे वेधतात! कटकमिशन ज्यांनी कोविडमध्ये बॉडी बॅगचे खाल्ले, महाठग तर महाराष्ट्राचे हेच होते ना ठरले? अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली.
शरद पवारांनी डाव टाकला, विदर्भातील बडा नेता अजितदादांची साथ सोडणार?
मविआकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असतील यावर राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने उद्धव ठाकरेंचं नाव पुढं केलं जातय. मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून याबाबत निवडणुकीच्या निकालाची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. तेथे काही दिवस वास्तव्य करून त्यांनी गांधी परिवाराची भेट घेतली होती. या भेटीत मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपल्याला करावा, अशी विनंती ठाकरेंनी केल्याचं भापजनं म्हटलं होतं.
दरम्या, आता शेलारांनी ठाकरे पिता-पुत्र कटोरा घेऊन फिरतात, अशी टीका केली. यावर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.