प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Case Against Shinde Sena MLA Suhas Kande : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये शिंदेसेनाच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघाचे शिंदे सेनेचे (Shinde Group) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत (Nandgaon Assembly Constituency) सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काय प्रकरण आहे, त्यांच्यावर गुन्हा का दाखल झालाय? हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.
सुहास कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात (Assembly Election 2024) आलाय. याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विनोद शेलार, शेखर पगार यांनी काल रात्री विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
CM शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट! काँग्रेसच्या बंडखोरीने केदार दिघेंची डोकेदुखी वाढणार
नमूद केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की, सुहास कांदे हे विरोधी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. नांदगावमध्ये त्यांनी 28 ऑक्टोबर रोजी जैन धर्मशाळा प्रचारसभेत तक्रारदाराचे भाषण संपल्यानंतर तक्रारदारास फोन (Case Against MLA Suhas Kande) केला. फोन करून शिवीगाळ केली. त्यासोबतच जीवे मारण्याची धमकी देखील दिली, असा आरोप केला गेलाय. दरम्यान तक्रारदार निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला, असं देखील म्हटलंय.
Dr.Veena Dev Passed Away: मोठी बातमी! ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन
नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून सुहास द्वारकानाथ कांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते सध्या विद्यमान आमदार आहे. मात्र छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सुहास कांदेसमोर मोठं आव्हान निर्माण केलंय. समीर भुजबळ देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. परंतु आता नांदगाव मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट आलाय. नावाशी साधर्म्य असलेल्यया सुहास कांदेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.