Download App

जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं

गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे.

  • Written By: Last Updated:

मंचर : सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनीच भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद, बाजार समितीचे सभापती पद दिले. परंतु त्यांना जाण राहिली नाही. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नसल्याने ते आता वळसे पाटील (Dilip Walse Patil यांच्यावर एकेरी भाषेत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. मात्र, निवडणुकीत जनता निकम यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले. ते वळती गांजवेवाडी (ता. आंबेगाव) येथे दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ कोपरा सभेत ते बोलत होते.

वळसे पाटलांची ताकद दुपटीने वाढली; मोठ्या उद्योजकाने उचलला विजयाचा ‘विडा’

शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे म्हणाले की ” गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे. या नेत्याच्या विरुद्ध ३५ वर्षांत एकदाही चुकीची बातमी आली नाही. या विकास पुरुषाला आठव्यांदा विधानसभेत पाठविण्याची आपली जबाबदारी आहे. वळती गावाने आतापर्यंत वळसे पाटील यांना ७८ टक्क्यांपर्यंत मताधिक्य दिले आहे. या निवडणुकीत देखील मतदानाचा टक्का आणखी वाढेल, अशी आम्हाला खात्री असल्याचे लोंढे म्हणाले.

Video : मोठं मोठी कामे करण्याची क्षमता फक्त वळसे पाटलांमध्येच; आढळरावांची तुफान बॅटिंग

डिंभे बोगद्याच्या विषयावर बोला

दिलीप वळसे-पाटील यांनी तालुक्यात कोट्यवधींची कामे केली. त्यांच्यासोबतच तालुका फिरलेले देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळाली आहे. केवळ स्वार्थापोटी ते आता वळसे पाटील यांच्यावर एकेरी भाषेत टीका करू लागले आहेत. “आपणच खरे लाभार्थी आहात, आपण निष्ठा, विश्वास या गोष्टी सांगू नये.

पाण्याच्या योग्य नियोजनामुळे आंबेगावातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम झाले : वळसे पाटील

डिंभे धरणाच्या बोगद्याविषयी आमदार रोहित पवार, जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. देवदत्त निकम मात्र याविषयी भूमिका स्पष्ट करत नाहीत. परंतु बोगद्याला विरोध असणाऱ्या दिलीप वळसे पाटलांच्या खंबीरपणे पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचे गोविंद गांजवे म्हणाले. यावेळी शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, बारकू बेनके, भाजपचे पक्षनिरीक्षक अतुल ब्रह्मभट, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, उद्योजक मनोहर शेळके, वैभव उंडे, किसनराव लोखंडे आदी उपस्थित होते.

follow us