Download App

”स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देवदत्त निकम रोहित पवारांच्या ताटाखालचे मांजर बनलेत”

डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.

  • Written By: Last Updated:

मंचर : स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी देवदत्त निकम हे आमदार रोहित पवारांच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली. ते मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढच्या पिढ्यांचा विचार करून वळसे पाटलांकडून तालुक्याचा विकास : आढळराव पाटील

मविआचे उमेदवार देवदत्त निकम हे डिंभे धरणाच्या बोगद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट न करता जनतेची केवळ दिशाभूल करत आहेत. बोगदा करायचा की नाही? हे सरळ सरळ सांगून निकमांनी जनतेची दिशाभूल थांबवावी, असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.  बोगद्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट न करता आंबेगाव – शिरूर जनतेचे भवितव्यच ते पणाला लावायला तयार झाले आहेत.

आंबेगावच्या विकासासाठी वळसे पाटलांचीच गरज : आढळराव पाटील

विवेक वळसे पाटील म्हणाले डिंभे धरणाच्या बोगद्या विषयीची निकमांनी आपली भूमिका सरळ सरळ भूमिका स्पष्ट करावी. यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा बळी देऊ नये. वळसे पाटील हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. डिंभे धरणाचे पाणी कालव्याद्वारे नगर जिल्ह्याला देण्यास वळसे पाटलांचा विरोध कधीच नाही. परंतू धरणाच्या तळाशी बोगदा पाडून ते पाणी नेण्यास निश्चित विरोध आहे; कारण पुन्हा या परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण होईल.

आंबेगावात वळसे पाटलांचाच गाजावाजा; सर्व्हेतून संपूर्ण चित्र स्पष्ट

डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत. परंतू ते पत्र धरणातील अतिरिक्त पाण्या संदर्भात दिलेले होते. परंतू धरणाच्या तळाशी पाडल्या जाणाऱ्या बोगद्याला वळसे पाटलांनी विरोध केला. त्यामुळेच शरद पवारांची साथ सोडल्याचे विवेक वळसे पाटीम म्हणाले. मात्र, आता स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी निकम हे आमदार रोहित पवारांच्या ताटाखालचं मांजर बनले असल्याचे ते म्हणाले.

follow us